अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे पाच दिवस महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन

0

जळगाव : श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे शनिवार, ६ आॅक्टोंबरपासून पाच दिवसीय श्री महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या पाच दिवसांच्या उत्सवामध्ये कार्यक्रमाची सुरूवात, त्यानंतर गो सेवा, भोजन वितरण, एलइडी वितरण, शोभा यात्रा तसेच ध्वजवंदन, व शेवटच्या दिवशी श्री अग्रसेन जयंतीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे़ त्यामुळे या उत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हितेश अग्रवाल यांनी केले आहे.