अजगराला लपेटून झोपतेय महिला

0

नवी दिल्ली । साप किंवा अजगर यांचा विचार जरी मनात आला तरी भीतीने थरकाप उडतो. मात्र, असेही अनेक जण आहेत, जे साप आणि अजगर घरामध्ये चक्क पाळतात. त्यातील एक महिलेचा किस्सा सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती महिला रात्री घरात पाळलेल्या अजगरासोबत चक्क झोपते. दरम्यान हा अजगर जरी दिसताना त्या महिलेचा जवळचा मित्र वाटत असला, तरी त्यांच्यातील हिंस्त्र भावना कायम असून तो एक दिवस त्या महिलेलाच भक्ष्य करणार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांंनी काढला आहे. त्यामुळे अशा हिंस्त्र मनोवृत्तीच्या प्राण्यांचा भरवसा करता येत नाही, हेच यातून स्पष्ट होते.

7 फुटांचा अजगर बिछान्यावर वावरतो!
7 फुटांचा हा मोठा अजगर आहे. त्याला एक दिवसासाठी खाण्यापिण्यासाठी सोडले जाते. काही दिवसांनंतर महिला जेव्हा त्या अजगराला घेऊन डॉक्टरकडे जाते. तेव्हा आश्‍चर्यकारक खुलासा त्या महिलेने केला. जेव्हा तिला हा अजगर दररोज रात्री तुमच्यासोबत झोपतो का?, असा प्रश्‍न विचारला, तेव्हा तिने हो असे उत्तर दिले. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा विचारले की, अजगर तुमच्या शरीराभोवते वेटोळे घालून झोपतो की सरळ झोपतो? तेव्हाही त्या महिलेने सरळ झोपतो असे उत्तर दिले.

अजगराचे महिलेवर प्रेम नसावे
त्यानंतर त्या डॉक्टरांनी काही निष्कर्ष काढले, तो अजगर त्या महिलेवर नितांत प्रेम नसून वेटोळे घालून झोपत नाही, तर तो प्रत्येक वेळ अंदाज घेतो की, त्यांची उंची त्या महिलेच्या उंची इतकी झाली का नाही, जेणेकरून तिला एक दिवस गिळता येईल. त्या डॉक्टरने स्पष्ट केले की, एक दिवस तो अजगरच त्या महिलेला गिळंकृत करणार आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.