अजनाड पुनर्वसन रस्त्याचे भाग्य उजळण्याची आशा

0

प्रशासनातील अधिकार्‍यांनी केली पाहणी : सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

रावेर- अजनाड पुनर्वसन रस्त्याची रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी पाहणी करीत तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. अजनाड गावाचे पुर्नवसन झाले असून जुना अजनाड रस्ता रहदारीसाठी अत्यंत दयनीय झाल्याने ग्रामस्थाना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण होत होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी गाडीलकर यांनी नुकतीच पाहणी करून रस्त्याबाबत अहवाल देण्याचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांना सांगितले होते. ढगे यांनी अजनाड गावात जाऊन रस्त्याची पाहणी केली व पालकमंत्री रस्ता योजनेंतर्गत या रस्त्याचे काम मंजूर होण्यासाठी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. सोबत मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होेते.