भुसावळ- मध्य रेल्वेने 24 फेब्रुवारी रोजी अजनी येथून पुणे जाण्यासाठी एकल सुपर फास्ट स्पेशल रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01414 अजनी-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडी (वन वे) असून ती रविवार, 24 फेब्रुवारी रोजी अजनी येथून 12.50 वाजता सुटून 5.10 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड व दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकलित द्वितीय, दोन तृतीय, 11 स्लीपर तसेच चार जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. 23 रोजी सर्व तिकीट आरक्षण केंन्द्र व आयआरसीटीसीच्या माध्यमातून काढता तिकीट बुकींग करता येणार आहे.