रेल्वे प्रवाशांची गणेशोत्सवात होणार सोय
भुसावळ- गणेशोत्सवात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी पाहता गैरसोय टळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अजनी-झाराप दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01203 ही 10 सप्टेंबर रोजी अजनी येथून 7.50 वाजता प्रस्थान करेल तर ही गाडी दुसर्या दिवशी 9.30 वाजता झारापला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01204 ही झाराप येथून 10 वाजता सुटेल तर ही गाडी दुसर्या दिवशी 10 वाजता अजनीला पोहोचेल.
या स्थानकांवर विशेष गाडीला थांबे
अप-डाऊन अजनी-झाराप गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाल रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.