३२ वर्षाची विवाहिता, २२ वर्षाच्या प्रियकाराची ‘अजब प्रेम की गजब कहानी’

0

वाद पोहचला एमआयडीसी पोलीस ठाण्यात

प्रियकरासोबत लग्नासाठी विवाहितेची पतीसह 3 मुलांना सोडचिठ्ठी

पती, पत्नीसह तिचा प्रियकराचा गोंधळ

जळगाव : शहरातील एका परिसरातील विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी चक्क पती तसेच तीन मुलांना सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णय घेतला. 32 वर्षाची विवाहिता 22 वर्षाचा प्रियकर अशा अजब प्रेम की गजब कहाणीचा रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रत्यय आला. या कहानीमुळे पतीसह विवाहिता तसेच तिच्या प्रियकराने पोलीस ठाणे गाठत गोंधळ घातला. अखेर कायदेशीर घटस्फोट देण्याच्या निर्णयानंतर वादावर पदडा पडला. पती, पत्नी और वो च्या कहाणीने पोलीसही अवाक् झाले होते.

प्रतिभाचे (काल्पनिक नाव) जामनेर तालुक्यातील सासर तर चोपडा तालुक्यातील बाहेर आहे. तिला तीन मुले असून पती एमआयडीसीला कामाला असल्याने कुटूंबासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. तिच्या घराजवळ करन (नाव बदललेले) राहत असून त्याच्यासोबत तिची ओळखी झाली. ओळखीतून प्रेम बहरल्याने या प्रेमप्रकरणातून प्रतिभा करनसोबत पळून गेली होती.

प्रेमप्रकरणामुळे पतीचे पत्नीसोबत वाद
प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रतिभा व तिच्या पतीत वाद होवू लागले. या वादातून प्रतिभाचा पती घर सोडून मुलांसह त्याच्या जामनेर तालुक्यातील मूळ गावी निघून गेला. प्रियकरासोबत पळालेली प्रतिभा घरी आल्यावर तिने पुन्हा वाद विसरुन पतीसोबत संसार करण्याची संमती दर्शविली. या संमतीनंतरही ती प्रियकर करनला सोडायला तयार नव्हती. अशातच करनही तिच्यासोबत लग्न करण्यावर ठाम असल्याने पती, पत्नी व प्रियकर अशा तिघांमध्ये झालेला वाद रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचला. यावेळी पतीकडचे नातेवाईक तसेच प्रतिभा व तिची आई उपस्थित होते.

विवाहितेचा प्रत्येक वेळी नवीन प्रियकर
प्रेमप्रकरण असलेल्या पत्नीला वागविण्यास पतीने नकार दिला. यानंतर एकमेकांना नोटीसा पाठविण्यापर्यंत प्रकरण चिघळले. पोलिसांनी माहिती घेतल्यावर विवाहितेचा प्रत्येक वेळी नवीन प्रियकर असल्याने तसेच ती यापूर्वी चार वेळा पळून गेली असल्याचे समोर आले. त्यामुळे अखेर पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनीही दोघांना न्यायालयातून घटस्फोट घेण्याचा सल्ला देत, तसेच विवाहितेच्या प्रियकरालाही लग्न केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, असे समजाविले. घटस्फोटाच्या निर्णयावर पती-पत्नीमध्ये निर्णय झाल्यानंतर वादावर पदडा पडला. सर्व जणांनी परतीचा मार्ग धरला.