मुंबई: संगीतकार जोडी अजय – अतुल सध्या धडक चित्रपटाच्या गाण्यांमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत. हंगामा बॉलिवूड म्यूझिक फेस्टीव्हलच्या प्रोजेक्ट ४.० चे आयोजन पुढील महिन्यात होणार आहे. यात पहिल्या दिवशी अजय अतुलची वर्णी लागली आहे.या विशेष म्यूझिक फेस्टीव्हलचे आयोजन २० आणि २१ ऑक्टोबर रोजी जियो गार्डन्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे करण्यात येणार आहे.
यात ५० दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यात संगीताचे १० प्रकार सामिल करण्यात आले असून सुफी ते रॉक सर्व प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये
आपल्या आवडीचे दिग्गज कलाकार या इव्हेन्टमध्ये आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे संगीत शौकिंनासाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.