भुसावळ- अजामीनपात्र गुन्ह्यात न्यायालयात सातत्याने गैरहजर राहणार्या सोनू मोहन अवसरमल (20, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. आरोपीविरुद्ध सीआर क्रमांक 49/2017 अन्वये गुन्हा दाखल होता. आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यांच्याविरुद्ध पॅकड वॉरंट जारी करण्यात आले होते. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक बोदडे, विकास सातदिवे, राहुल चौधरी, उमाकांत पाटील आदींनी केली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील पसार असलेल्या ईम्रान उर्फ इम्मू तलवार पिंजारी (21, रा.भारत नगर, भुसावळ) यास बुधवारी अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध 18 मार्च रोजी गुन्हा दाखल असून तेव्हापासून तो पसार झाला होता. तो शहरातील महात्मा फुले नगर भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर हवालदार सुनील जोशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, राहुल चौधरी उमाकांत पाटील आदींनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.