अजिंठा चौफुलीजवळ हाणामारी

0

जळगाव। अजिंठा चौफुलीजवळ हॉटेल मुरलीमनोहर समोर शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून हाणामारी झाली. त्यात एका तरूणावर दोघांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक करून रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

अजिंठा चौफुलीवर ग्राहकांवरून शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरू असलेला वाद उमरखान हयातखान पठाण (वय 34) हे सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजय प्रकाश राजपूत (वय 23, रा. कांचननगर), जमशेर खाँ रज्जाक खाँ पठाण (वय 52) यांनी उमरखान पठाण यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असेलल्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन्ही संशयिताना अटक केली. त्यांना रविवारी न्यायाधीश खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यात जमशेरखाँ याचा जामीन मंजूर करण्यात आला. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.