पहूर । अजिंठा डोंगरातील रानमेव्याला खानदेशात चांगली मागणी असून रखरखत्या उन्हात डोंगरची काळी मैना , करवंद, चारं सध्या मोठ्या प्रमाणात विकली जात असून यातून असंख्य हातांना रोजगार मिळाला आहे. अजिंठ्याच्या डोंगररांगांत करवंद, चारं यांची मोठी झाडी आहे. उन्हाळ्यात हा रानमेवा बहरतो. स्थानीक लोक रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. या व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.
दीडशे ते दोनशे रूपये किलो
’डोंगरची काळी मैना ’चारं आरोग्यदायी असून दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलोने विक्री होत आहे . घरबसल्या मिळणार्या या रानमेव्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड जंगलतोड आणि वणव्यांमुळे करवंदाची झाडं दिवसेंदिवस कमी होत आहेत . गेल्या 2ज वर्षाच्या तुलनेत करवंदाची झाडे मोठ्या संख्येने घटली आहेत. अजिंठा, सिल्लोड या भातील डोंगरची काळी मैना सध्या खानदेशात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आंबट -तुरट चवीचा हा रानमेवा चाखण्यासाठी करवंदाच्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगीतले . पुर्वी वाट्यावर मिळणारा हा रानमेवा आता दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे.
उन्हाळ्यात मिळणारी डोंगरची काळी मैना आरोग्यवर्धक आहे. आम्ही परंपरागत हा व्यवसाय करतो दिवसाकाठी तीनशे रुपये मिळतात . दिवसेंदिवस करवंदाची झाडे कमी होत आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे
– सुरेश सोनोने,
रानमेवा विक्रेता, सिल्लोड