Attempt To Extend ATM in Nachankheda Failed : Lakhs Of Cash Safe जामनेर : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गॅस कटरद्वारे एटीएम फोडून लाखोंची रक्कम लांबवण्यात आली होती तर या प्रकरणी जामनेरसह हरीयाणातील आरोपींना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर पुन्हा जळगाव जिल्ह्यातील नाचणखेडा, ता.जामनेर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन लांबवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवार, 5 रोजी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पहूर पोलिसात गुन्हा दाखल
या संदर्भात दीपक दौलत तिवारी (वय 38, रा.सोपान नगर, सत्यम पार्क, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवार, 5 सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शिवाजी चौक, शिवाजी नगर, नाचणखेडा, ता. जामनेर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी कॅबीनचा उघड्या दरवाज्यातून आत येत एटीएम मशीनचा कॅबीनचा दरवाजा तोडला. त्यानंतर मशीन कॅबीनमधुन बाहेर काढुन मशीनची तोडफोड करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न करून नुकसान केले मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला असून लाखोंची रोकड सुरक्षित राहिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.