शहादा । शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईच्या शेतातून अज्ञान माथेफिरूने सुमारे 700 पपईचे झाडे कापून फेकल्याची घटना घडली. वारंवार अशा घटनामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राम्हणपुरी येथील शेतकरी मुरलीधर गोविंद पाटील यांचे नवलपूर शिवारात शेत आहे. आपल्या पाच एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली आहे. दोन ते तीन महिन्याची पपई झाली असून पपईचे झाडे 3-4 फूट उंचीवर गेले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सुनील मुरलीधर पाटील हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतातील पपईचे एक एकर क्षेत्रामधील सुमारे 700 झाडे कापलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना कापलेली झाडे पाहताच धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा करत आपल्या आजूबाजूच्या शेतक्यांना बोलवले. संबधित शेतकर्यांचे सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले. वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.