जळगाव– शिवाजीनगरातील महावीर जिनींगच्या कंपाऊंडगधून लक्ष्मीकांत सोमनाथ शेठे (मुराबाद) यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे़. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लक्ष्मीकांत शेठे यांनी ३ मे रोजी महावीर जिनींगच्या कंपाऊंडटमध्ये त्यांची दुचाकी (क्ऱ एमएच़एएस़०३१८) ही उभी केली होती़ मात्र, कुणीतरी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार ५ मे रोजी सकाळी उघडकीस आला़ अखेर अडीच महिन्यानंतर याबाबत त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास संजय भालेराव हे करीत आहे .