अज्ञात ट्रकच्या धडकेत अटवाड्याचे दोन तरुण गंभीर

0

रावेर- रावेरचा शुक्रवारचा बाजार असल्याने बाजार आटोपून घराकडे जात असतांना मोटारसायकलला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना 4 जानेवारीच्या सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास कर्जद गावाजवळ घडली. धडक देवून ट्रक चालक फरार झाला आहे. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली. रावेर येथील बाजार घेवून घरी अटवाडे येथे जात असतांना कर्जदगावाजवळ दुचाकी (एम.पी 09 क्यू.एल.3035) स्वार सुभाष नारायण ठाकूर (45) व विनोद किसन पाटील (35) यांना अज्ञात भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने दोघ गंभीर जखमी झाले. जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.बी बी.बारेला यांनी प्राथमिक उपचार करून सुभाष ठाकूर यांला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. विनोद किसन पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.