मुक्ताईनगर- दुचाकीने बर्हाणपूरकडून मलकापूरकडे जात असलेल्या मलकापूरच्या दुचाकीस्वारांना अज्ञात ट्रकने धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना 8 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुरनाड फाट्याजवळ घडली. या प्रकरणी गौरव विकास पाटील (मलकापूर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव व त्यांचा मित्र सागर संतोष खोलगडे हे दुचाकी (एम.एच.28 बी.सी.2443) ने जात असताना अज्ञात ट्रक चालकाने धडक देत पळ काढला. यात दोघे मित्र जखमी झाले. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शैलेश चव्हाण करीत आहेत.