वरणगाव : अज्ञात माथेफिरूने चार एकरावरील कांदे बिजवाईवर अज्ञात औषध फवारल्याने शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार शेतकरी रामा खंडू फेगडे यांचे बोहर्डी शिवारात शेत गट क्रमांक 147 मध्ये शेत असून या शेतात सुमारे 30 हजार रुपये खर्चून कांदे बिजवाई केली होती मात्र 31 रोजी मध्यरात्री ते 1 सप्टेंबरच्या पहाटे सहा वाजेदरम्यान अज्ञात माथेफिरूने या बिजवाईवर काहीतरी विषारी औषध फवारून दिल्याने शेतकर्याला फटका बसला. या बिजवाईचे शेतकर्यास मोठे उत्पन्न मिळाले असते मात्र माथेफिरूमुळे शेतकर्याला मोठा फटका बसला.