जळगाव । जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरील बाजूस व हॉटेल मोराक्को समोर असलेल्या लहान व्यवसायीक दुकानांवर 4 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्राकडून येणार्या अज्ञात चार चाकी वाहनाच्या चालकाने वाहन थेट नेल्याने तीन दुकानाचे नुकसान झाले असून तिन्ही दुकानाच्या भिंती कोसळल्या आहेत. याबाबत शहर पोलिसात अज्ञात वाहन विरोधात नोंद करण्यात आली आहे. हॉटेल मिरीको समोरील व जिल्हा सत्र न्यालयाच्या बाजूला असलेल्या कॉम्प्यूटर टायपिंगसाठी लहान लहान दुकाने आहे. त्यात टायपिंग, नास्ता व हेअर कटींगची दुकाने व्यवसायीकांनी थाटले आहे. 4 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चार चाकी वाहनावरील चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट दुकानात नेल्याने कारसह तिन दुकानांचे नुकसान झाले. यात तिनही दुकानाचे शटर आणि किरकोळ सामानाचे नुकसान झाले आहे.
यांचे झाले नुकसान
चव्हाण टायपिंगवरील दिनेश रामकुमार चव्हाण यांचे आणि महावीर कॉम्प्यूटरचे मालक योगेश बन्सीलाल पारख यांच्या दुकानाची भिंतीसह शटर तुटून पडले. यांच्या दुकाना जिल्हा न्यायालयात लागणार्या कागदपत्रांची कॉम्प्यूटर टायपिंगची कामे करतात. तर हेअर कटींग सलूनचे लक्ष्मण कुंवर यांच्या दुकानातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. या घटनेत मात्र कुणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते.