नवापूर । तालुक्यातील डोकरे सरफणी नदीच्या फुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक दिल्याने एका शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पंकज मधुकर पाटील वय (35) असे त्यांचे नाव असून ते शाळेतून घरी जात असताना हा अपघात घडला. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पंकज पाटील मोटरसायकलसह खाली कोसळले त्यानंतर त्यांच्या चेहरा व छातीचा भागावरून अवजड वाहन गेल्याने त्यात चिरडले गेले काही अंतरापर्यत पंकज पाटील व मोटरसायकल क्रमांक एम एच 18 ए.बी 2205 फरफट गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. पोलिसांना ओळख पडणं अवघड जाते होते काही ग्रामस्थ व पोलिसांनी अपघातची माहिती मिळताच शाळेतील मुख्याध्यापक किसन घोडसे व अधिक्षक मच्छिंद्र पिंपळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. शाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक पंकज मधुकर पाटील असल्याची ओळख झाली.