वाकड : दुचाकीवरुन घरी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली. अमोल उद्धव टाके (वय 30, रा. वडगाव बुद्रूक) असे मृत तरुणाचे नाव आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाके रात्री दुचाकीवरुन घरी जात असताना भऱधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये टाके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.