आकुर्डी : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालवणार्याचा मृत्यू झाला आहे. तर, मागे बसलेल्या तरुण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री एकच्या सुमारास आकुर्डी येथे घडली. जितेंद्र चौधरी (रा. शिक्रापूर ) याचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकीवर मागे बसलेला उस्मान बादशाह बागवान हा जखमी झाला आहे.
हे देखील वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि उस्मान दुचाकीवरून निगडी येथून चिंचवडच्या दिशेने जात असताना आकुर्डी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये जितेंद्रच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.तर, उस्मानच्या हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.