अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धरणगाव : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. योगेश मराठे (19, रा.बोरगाव, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरीजवळ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

पेट्रोल घेवून येत असताना अज्ञात वाहनाने उडवले
योगेश मराठे हा तरुण दुचाकी (एम.एच.19 डी.यू.5379) ने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे पेट्रोल घेण्यासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात निघाला असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.