अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील दादावाडीनजीक समोरुन येणार्‍या अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 5 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवकॉलनीमधील रहिवाशी प्रमोद एकनाथ पाटील वय 56 हे त्यांच्या मोटारसायकलीने महामार्गावरून जात असतांना, समोरून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना जबर दुखापत झाली.

नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. सुरतवाला यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ. राजेंद्र बोरसे करीत आहे.