जामनेर । जळगावकडून जामनेरकडे जाणार्या मोटारसायकलस्वार पुढे चालणार्या डंपरला ओव्हर टेक करतांना असतांना वाळूवाहक डंपरने ब्रेक लावल्याने मोटारसायकधारकाचा उजवीकडे तोल गेल्याने समोरून येणार्या अज्ञात भरधाव चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीचा ठार झाल्याची घटना जामनेर येथील शासकीय विश्रामगृहासमोर 14 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. यात तरूणाचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजूरीचे काम आटोपून जळगावरोडवरून जामनेरकडे जात असतांना तालुक्यातील धाडवड येथील तडवी (वय अंदाजे 40) नामक व्यक्ती मोटारसायकल क्र.(एमएच 19 पीके 4484) जात होता. पुढे वाळूवाहक डंपर क्रमांक (एमएच 19 5808)ला ओव्हर टेक करत असतांना अचानकपणे डंपरने ब्रेक लावल्याने मागे असलेल्या मोटारसायकल स्वारने स्वतःला वाचविण्याच्या नादात तोल जावून दुचाकी उजवीकडे गेल्याने समोरून भरधाव येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. जामनेर येथील शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या अपघातात तडवी (पुर्ण नाव माहित नाही) जागीच ठार झाला.