शिंदखेडा : दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र अंबर मोहिते (45) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली़ पोलीस कर्मचारी राजू मोहिते शिंदखेडा येथील आपले कर्तव्य बजाविल्यानंतर दुचाकीने धुळ्याकडे येत असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोनगीरनजीक बाभळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ पोलीस मुख्यालयातून ते गेल्या सहा महिन्यांपुर्वीच शिंदखेडा पोलीस स्टेशनला त्यांची बदली झाल्याचे सूत्रांनी सांगितले.