शहादा। तालुक्यातील मंदाणे गावाजवळ समोरून अज्ञात वाहनाच्या धडकेने समोरून येणार्या मोटरसाइकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. जखमीपैकी एकाला मंदाणे येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागरीकांनी पोलिसांना आरोग्य केंद्रास अपघाताची सूचना देवून देखील रूग्नवाहिका दाखल झाली नाही.
या कारणामुळे नागरीकांचा उद्रेक होत होता.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रहिवासी व शहादा येथे बांधकामाचा ठेका घेणारा सुभाष मिस्तरी (रा. बंधारा दगड गाठी,रा.रयखेडी)हे आपले काम आटोपून शहादाहुन मोटरसाइकल (एमपी 46 एम 7162) ने परत येत असतांना मंदाणे कडून जाणार्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोघी जागीच ठार झाले तर रमेश तिरसिंग पावरा (रा.जलगोन, मध्यप्रदेश) याची प्रकृती चिंताजनक असल्याने गावातील नागरीकांनी उचलून प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाणे येथे दाखल केले. परंतु त्याची अवस्था चिंताजनक असल्याने त्याला नंदुरबार येथे हलविण्यात आले.