अज्ञात समाजकंटकांनी पेटविली भरवस्तीत कार

0

शिरपूर- शिरपूर शहादा रस्त्यापासून जवळच असलेल्या भरवस्तीत रात्री 12.45 वाजता कार पेटवून दिल्याची घटना घडली. शिरपूर येथील आर.सी.पटेल आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांची मारुती सुझुकी सियाझ कार रविवार 5 फेब्रुवारी रोजी रात्री 12.45 वाजता अज्ञात समाज कंटकांनी पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेतून शिरपूर शहरात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून अज्ञाततांना पकडणे पोलिसांना पोलिसांना आव्हान दिले.

पेट्रोल टाकून पेटविली कार
प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील यांचे वास्तव्य भरवस्तीत असलेल्या शास्त्री नगर मधील प्लॉट नं. 35 येथे गेल्या 14 वर्षांपासून आहे. राहत्या बंगल्याच्या अंगणात उभी केलेल्या एम.एच. 18 एजे 5661 क्रमांकाच्या कार वर पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिल्याची ही घटना असून अतिशय चीड निर्माण करणारी घटना आहे. कारच्या बाजूला बाटली पडल्याचे दिसून आले. रात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली आहे. रात्री काहींनी ही घटना घडल्याचे सांगितल्यावर प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील व नातेवाईक यांनी पाण्याने कार विझवायचा प्रयत्न केला.