नवी दिली-भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज हरिद्वारमध्ये गंगा नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. येथे त्यांच्या अस्थींचे विसर्जन केल्यानतंर देशातील १०० नद्यांमध्येदेखील त्यांच्या अस्थी प्रवाहित करण्यात येणार आहेत.
अस्थी विसर्जन कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह आदींसह भाजप नेते उपस्थित राहणार आहेत. हरिद्वारमध्ये दोन किलोमीटरपर्यंत लांब अस्थी विसर्जन यात्रा निघणार असून, भाजपाचे १५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दिल्ली येथील स्मृतीस्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येथून तीन अस्थिकलशांमध्ये त्यांच्या अस्थी आणि रक्षा जमा करण्यात आली आहे.