पिंपरी-चिंचवड महापालिके अंतर्गत येणाऱ्या फुगवाडी येथील शाळेची अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि भारत सरकारच्या एनआयटीआयच्या प्रमुख उपक्रमा अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) साठी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्योजकता आणि कौशल्य वाढविण्यावर भर देण्यात आले आहे. फुगेवाडी येथील शाळेचा या अंतर्गत विकास केला जाणार आहे. या ठिकाणी प्रयोगशाळा विकसित केले जाणार असून विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण देण्यावर भर दिले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती सोनाली गव्हाणे यांनी सुरुवातील एका शाळेची निवड करण्यात आली आहे नंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांचा देखील यासाठी निवड केली जाणार असल्याचे सांगितले. नवीन उपकरणे आणि प्रकल्प हाताळण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार देखील नेमला जाणार आहे.