नवी दिल्ली : केंद्र सरकार अटल पेन्शन योजना घेतलेल्या लोकांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ करुन ही रक्कम १० हजार होऊ शकते. सध्या ही मर्यादा ५ हजार रुपये आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एका कार्यक्रमात डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील जॉईंट सेक्रेटरी मदनेश कुमार मिश्रांनी याबाबत माहिती दिली.