अटल बिहारींच्या निधनाने शाहरुखची भावुक पोस्ट

0

नवी दिल्ली: भारतीय राजकारणातले एक युग पुरुष म्हणून ओळखले जाणारे अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या मनातील भावना अभिनेता शाहरुख खानही यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अटल बिहारींना श्रद्धांजली देत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांना जवळून पाहण्याची, त्यांच्यासोबतच काही क्षण व्यतीत करण्याची संधी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही मिळाली होती. त्याच आठवणींना उजाळा देत त्याने अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये शाहरुखने लिहले आहे की, जेव्हा तो त्याच्या वडिलांसह अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणांसाठी जात असे बऱ्याच काळानंतर त्याला अटलजींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यांची भेट घडणे म्हणजे त्याच्यासाठी दैवयोग होता, असे लिहत शाहरूखने या त्यांच्या बापजींना श्रद्धांजली दिली.