अट्टल गुन्हेगार पाच तासात जेरबंद

0
खडकी : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढलेल्या खडकी परिसरातील एका अट्टल गुन्हेगारास अवघ्या पाच तासात पुन्हा गजाआड करण्याची किमया पोलिसांनी केली आहे. सागर चांदणे (वय 19, रा.खडकी बाजार) हा आरोपीला पुन्हा पकडले आहे. खडकी पोलिसांनी सोमवारी (दि.14) चांदणेला अटक करुण खडकी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी चांदणे याची येरवडा कारागृहात रवानगी केली. खडकी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी चांदणेला येरवडा येथे घेऊन गेले. सायंकाळी 7 वाजता कारागृहाबाहेर पोलीस चांदणेला घेऊन थांबले होते. त्यावेळी लघुशंकेचा बहाणा करीत चांदणेने तेथुन पळ काढला. पोलिसांनी येरवडा पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली.