चोरीच्या पाच दुचाकींसह 11 चोर्यांमधील लाखोंचा मुद्देमाल जप्त
शहादा- चोर्या-घरफोड्यांसह दुचाकी लांबवणार्या पाच आरोपींच्या मुसक्या शहादा पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह 11 चोर्यांमधील लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खुनशा जंगल्या पावरा, प्रकाश विजय पावरा यांना दुचाकी तसेच मोबाईल चोरी प्रकरणात अटक करण्यात आली तर मोहसीन मिस्त्री, महेश उत्तम पावरा, शिवराम नथ्थु भामरे, दिनेश रवींद्र पाटील यांना चोरी-घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस.शुक्ला, सहाय्यक निरीक्षक एस.के.जाधव, उपनिरीक्षक डी.जे.बडगुजर यांच्यासह कर्मचार्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.