भुसावळातील पाच घरफोड्यांची उकल ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
भुसावळ: भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत तब्बल पाचपेक्षा जास्त घरफोड्या करणार्या आरोपींच्या मुसक्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. आदिलनबी कामील शेख (30) व आमीन शेख फिराज (24, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पाच एलसीडी टीव्ही, सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल मिळून एक लाख 94 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या आरोपींकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, सहाय्यक फौजदार सुमन कोलते, हवालदार शरीफ काझी, शिवाजी पाटील, विजय पाटील, दिलीप येवले, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, सुरेश महाजन, अशोक चौधरी, सतीश हाळनोर, युनूस शेख, विलास पाटील, दत्तात्रय बडगुजर, रामचंद्र बोरसे, महेंद्र पाटील, गफूर तडवी, दीपक पाटील, नरेंद्र वारूडे, प्रवीण हिवराळे आदींनी केली.