अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात : जंक्शनमधील तीन घरफोड्यांची उकल

डीबी शाखेची कारवाई : 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Three House Burglaries In Bhusawal Solved : Accused Market In Police Net  भुसावळ : बाजारपेठ पोलिसांच्या डीबी शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे घरफोड्या करणार्‍या संशयीताच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शहरातील विविध भागात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून सुमारे 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख मोसीन उर्फ बिलु शेख मुन्ना (30, आगाखान वाडा, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तीन घरफोड्या केल्याची कबुली
अटकेतील शेख मोसीन उर्फ बिलु शेख मुन्ना (30, आगाखान वाडा, भुसावळ) या आरोपीने शहरातील जाम मोहल्ला भागातील रत्ना राजेश परदेशी यांच्या बंद घरातून 20 हजारांचे दागिने तसेच पांडुरंगनाथ नगरातील दिनेश भोजलाल लोहार (34) यांच्या घरातून 20 हजार दोनशे रुपये किंमतीचे दागिणे व नसरवांजी फाईल भागातील रूबीना रफिक गवळी (26) यांच्या घरातून सहा हजार आठशे रुपये किंमतीचा ऐवज लांबवल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातील तीनही घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, नाईक निलेश चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली.