भुसावळ– चेन चोरीबाबत महाराष्ट्रात कुविख्यात असलेल्या भुसावळातील सादीकअली इबादतअली इराणीसह जावेद फिरोज अली व फरीदाअली इबायत अली यांच्याविरुद्ध मोक्कातंर्गत कारवाई करण्याबाबत अंबेजोगाई विभागाचे सहाय्यक अधीक्षक विशाल आनंद यांनी पुढाकार घेतला आहे. आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वाचक गणपत जाधव यांना भुसावळात पाठवले असून त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. कुविख्यात सादीकवर महाराष्ट्रभर गुन्हे दाखल आहेत तर चेन चोरीच्या आरोपात तो पुण्याच्या कारागृहात आहे. आरोपींचे कुठल्या बँकेत खाते आहे वा बेनामी संपत्ती आहे त्याबाबतदेखील आढावा घेतला जात असून स्थानिक बँकांशी पत्रव्यवहारही करण्यात आला. याकामी प्रदीप पाटील, राजेंद्र तोडकर, सुधीर विसपुते सहकार्य करीत आहेत.