अट्टल दुचाकी चोरटा चोरीच्या आठ दुचाकींसह अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात

अमळनेर पोलिसांनी नाशिकातून आवळल्या दुचाकी चोरट्याच्या मुसक्या : आठ दुचाकी जप्त

अमळनेर : अमळनेर पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळत पोलिस ठाणे हद्दीतील आठ चोरलेल्या दुचाकी जप्त केल्या. आरोपीविरोधात नाशिक येथे गुन्हा दाखल असल्याने नाशिकमधून आरोपीला अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर तालुक्यात अलीकडच्या काळात मोटारसायकली चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. पोलीस पथक याबाबत तपास करत होते. दरम्यान, पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना नाशिक येथील मोटारसायकल चोरीच्या तपासात अमळनेर तालुक्यातील मुळचा रहिवासी असलेल्या चेतन कमलाकर पाटील (रा.भरवस, ता.अमळनेर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या सहकार्‍यांना पाठवून चेतन पाटील याला ताब्यात घेतले असता त्याने तालुक्यात मोटारसायकलींची चोरी केल्याचे मान्य केले. यासोबत त्याने एकूण 2 लाख 33 हजार रूपये मूल्य असणार्या आठ मोटारसायकली आणून दिल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंखे, सिध्दांत सिसोदे आणि गणेश पाटील यांच्या पथकाने केली.