जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधत त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. मनीष उर्फ मायाराम जनरलसिंग यादव (ग्वालियर, ह.मु.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने जळगाव शहर हद्दीतील तीन तर जिल्हापेठ हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.