अट्टल दुचाकी चोरटा बोदवड पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या पाच दुचाकी जप्त

बोदवड : अट्टल दुचाकी चोरट्यास बोदवड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. अविनाश विज्ञान बोदडे (27, रा.शेलवड, ता.बोदवड, ह.मु.लपाली, ता.मोताळा जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बोदवड शहरातील शेख सिकंदर शेख मुक्तार (रा.हिदायत नगर) यांची दुचाकी (एम.एच.19 ए.एफ.4707) अज्ञात चोरट्याने लांबवल्याप्रकरणी बोदवड शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. दुचाकीची चोरी करणारा संशयित आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाल्यानंतर पथकाने आरोपी अविनाश विज्ञान बोदडे (27) यास अटक केली. संशयीताने पोलिस चौकशीत चोरीची दुचाकीसह अन्य चार चोरीच्या दुचाक्या काढून दिल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे, हवालदार रवींद्र गुरचळ, हवालदार वसंत निकम, पोलिस नाईक शशिकांत शिंदे, मुकेश पाटील, दिलीप पाटील, मनोहर बनसोडे, ईश्वर पाटील आदींनी केली.