भुसावळ- दुचाकी लांबवणार्या अट्टल दोघा चोरट्यांना बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. नारायण सुनील खरारे (26, रा.आगवाली चाळ, भुसावळ)व सागर हरीचंद्र काकडे (25, रा.फेकरी, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुरनं.434/2018, भादंवि कलम 379 अन्वये दाखल गुन्ह्याल गुन्ह्यातील दुचाकी लांबवल्याची कबुली असून दुचाकी जप्त करण्यात आली आहे शिवाय आरोपींनी अन्य काही दुचाकी लांबवण्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील जोशी, हवालदार माणिक सपकाळे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, किशोर महाजन, रवींद्र तायडे आदींनी केली.