अडावद । पंकज पब्लिक ग्लोबल स्कुल चोपडा विद्यालयाची विद्यार्थीनी पायल सुरेश बाहेती हिने 10 वीच्या (सीबीएससी) परिक्षेत 96.80 टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पायल ही अडावदचे प्रगतशील शेतकरी सुरेश लक्ष्मीनारायण बाहेती यांची मुलगी आहे. विद्यालयात प्रथम आल्याबद्दल पंकज विद्यालयाचे चेअरमन, प्रिंसीपल, शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थीनी पायल हीने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वस्तरातुन तिचे कौतुक करण्यात केले जात आहे.