चोपडा । अडावद-धानोरा जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या गटासाठी काँग्रेसचे दिलीप पाटील यांच्या प्रचारार्थ रॅलीला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. सदरील रॅली अडावद-धानोरा गटातील अडावद, धानोरा, मोहरद, ईच्छापुर, चांदण्या तलाव, पानशेवडी, बिडगांव, कुड्यांपाणी, वरगव्हाण, शेवरे, खर्डी, लोणी, पंचक, बढई, बढवाणी, खंडने या परीसरात रॅली काढून प्रचारास जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. केंद्र शासन व राज्य शासन जि.प.च्या माध्यमातून केलेला विकास कामाची माहिती देत गोरगरिबांच्या व शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी असून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी गटात चौफेर विकास करण्यासाठी काँग्रेसकडून दिलीप पाटील उमेदवारी लढवित आहे. तर धानोरा पंचायत समितीच्या गणासाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना दिनेश पाटील यांना उमेदवारी मिळाली असून गटात जलयुक्त शिवार राबविणे, कोल्हापुर पॅटर्न बंधारे बांधने, पाणी आडवा पाणी जिरवा, गटातील गावे हगणदरीमुक्त करणे, उन्हाळ्यात जिल्हा परीषद निधीतून पाणी टंचाईवर अधिक भर देणे, नविन बोरवेल करणे, रस्ते, पाणी, विज, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, शिक्षण, सिंचन ह्या सर्व बाबींकडे विशेष लक्ष केंद्रीत करून विविध समस्या सोडविण्यास सदैव तत्पर राहीली ग्वाही कल्पना पाटील यांनी दिली.
विविध विकास कामे करण्यासाठी कटीबद्ध
नुकतेच देशमुख वाड्यातील संकट मोचन मारोती मंदीरात जावून माजी सभापती देशमुख यांच्या उपस्थतीत प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला सुरूवात आला. त्या प्रचारात त्यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या पुर्ण करण्याचे आश्वासन उमेदवार दिलीप पाटील यांनी मतदारांना दिले आहे. वीज, पाणी, रस्ते या मुलभूत सुविधा व गरजांवर अधिक भर पडणार असून विकास कामांकडे अधिक भर देणार आहे. या पुर्वीही गटात व गणात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आले असून विविध विकास कामे पुर्ण करण्यासाठी गटातील उमेदवार दिलीप युवराज पाटील यांनी दिले.
प्रचार रॅलीत नागरिकांचा सहभाग
प्रचार रॅलीत यावेळी चंद्रशेखर पाटील, वासुदेव देशमुख, माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील, कृउबास संचालक दिनकर देशमुख, डिगंबर पाटील, पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते गोदावरीताई देशमुख, कैलास पाटील, भागवत पाटील, डॉ.सुधाकर पाटील, माजी उपसरपंच वजाहतअली काझी, हाजी पीरु शेठ, सलिम खाँ न्याजोद्दिन हाजी फजल शेठ, सईद खाँ पठाण, शेख.झहिरोद्दिन शे. हाषम,शे.कबीरोद्दिन दिलफरोज, याकुब अली काझी, जहांगीर पठाण, लायकअली काझी, जावेद खाँ. हबीब खाँ, सलिम कुरेशी अमजद खाँ रऊफ खाँ मा.प.स.सदस्य शे. ताहेर शे. रज्जाक, कालु मिस्तरी, शेख शकीलोद्दिन, समशोद्दिन शेख रियाज शे. कबीरोद्दिन आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीती होती.