अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे वाटप

0

पिंपरी-चिंचवड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कडक मराठवाडा, जय लहुजी, जयभीम, जय महाराष्ट्र युवा संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. प्रशासन विभाग, नागरवस्ती विभाग, वैद्यकीय विभाग, जनसंपर्क विभाग या विभागांमध्ये या प्रतिमांचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक सचिन चिखले, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, राजू धुरंधरे, गणेश क्षीरसागर, रिपाइं वाहतूक शाखेचे अजिज शेख, बाळासाहेब खंदारे, मनोज पवार, बाबासाहेब पाटोळे, सुनील भिसे, वसंत वावरे, नितीन घोलप, अरूण धुरंधरे, आनंद गायकवाड, आनंद नायडू, अतुल सकट, सचिन काळे, दीपक लोखंडे, महेंद्र कांबळे, मनोज वाघमारे, गंगाराम जाधव, अक्षय दुनधव, मयूर थोरात, राजू जाधव, अतीश गाडे, गणेश धुरंधरे आदी उपस्थित होते.