जळगाव: के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील , ए.टी. झांबरे विद्यालय व ओरिओन स्टेट बोर्ड स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे जन्मशताब्दी व गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे शालेय समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर, के.जी.फेगडे , परीक्षक लीलाधर कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये शाळांच्या 200 ते 250 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या त्यामध्ये शाडूमातीपासून तयार केलेल्या मूर्तींची संख्या जास्त दिसून आली.विद्यार्थ्यांनी मूर्ती रंगविण्यासाठी निसर्गरंगांचा वापर केला.सुंदर व मनमोहक अशा मूर्तींनी शाळेचे प्रांगण सजून गेले.त्यात पहिल्या गटात (1ली ते 4थी) यज्ञेश सोनवणे (प्रथम) , वृषाली अत्रे (द्वितीय) , रोहित पाटील (तृतीय ) , दुसऱ्या गटात ( 5वी ते 7वि) सिद्धी महाजन (प्रथम), सिद्धी काळे (द्वितीय) , निसिका सपकाळे (तृतीय) तर गट 3रा (8वी ते 10वी) मोक्षदा चौधरी (प्रथम) , श्रीवरद सुतार (द्वितीय) , प्रणोती सोनार (तृतीय) क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश भालेराव, सतीश भोळे , पराग राणे , युवराज वांगेकर , राकेश जोशी , कल्पना तायडे , सरला पाटील , दिपाली पाटील, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रसंगी ए. टी. झांबरे विद्या.मुख्या.दिलीपकुमार चौधरी , प.वि.पाटील विद्या.मुख्या.रेखा पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.