अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्ययावत सुविधांसह नुतनीकरण करण्यात यावे

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्टेडीयमची दुरवस्था; खेळाडूंना करावा लागतो गैरसोयींचा सामना

सामाजिक कार्यकर्ते कुणाल जगनाडे यांची मागणी

पिंपरी- औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि, पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या स्टे डियमची अवस्था भयावह झाली असून खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने अद्यावत सुविधांसह स्टेडियमचे नुतनीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यक र्ते कुणाल जगनाडे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

1975 मध्ये उभारले स्टेडीयम
या निवेदनात जगनाडे यांनी सांगितले आहे की, ामगार कल्याण मंडळ व पिंपरी महापालिके च्यवतीने 1975 मध्ये अण्णासाहेब मगर स्टेडियम उभारण्यात आले. पाच हजार आसन क्षमता असलेले स्टेडियम 28 एकर जागेत वसले आहे. या मैदानावर विविध शालेय, व्यावसायिक स्पर्धा झाल्या आहेत. यातून कोट्यवधींचा निधी पालिके ला प्राप्त झाला आहे. परंतु, या निधीतून स्टे डियमची वेळोवेळी देखभाल केली नाही. त्यामुळे स्टेडियमची रया गेली आहे. स्टेडियममध्ये अस्ताव्यस्तपणे साहित्य टाकले आहे. त्यामुळे स्टे डियमला भंगार गोदामाचे स्वरुप आले आहे. बांधकामाची अवस्था दयनीय झाली आहे. भिंतीना चिरा पडल्या आहेत. याठिकाणी मद्यपी, प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्टेडियमची ही अवस्था पाहून क्रीडाप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्येदेखील स्टेडियमची इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच ठिकाणी मतदार नोंदणी कार्यालय देखील आहे. त्यामुळे या प रिसरात नागरिकांची वर्दळ असते. अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता आहे. राजकीय हेतूपोटी मगर स्टेडियम अखेरचा श्‍वास घेत आहे. परंतु, आयुक्तांनी याकडे गांभीर्याने बघावे. स्टे डियमचे अद्यावत सुविधांसह नुतनीकरण करुन खेळाडूंना उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी जगनाडे यांनी निवेदनातून केली आहे.