कै. चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानचा
सांगवी : नवी सांगवी येथील कै. चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी जलदिन व हवामान दिनाचे औचित्य साधून समाजातील पाणी बचत, पर्यावरण संर्वधनासाठी काम करणार्या व्यक्तीचा दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जलदिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांना पर्यावरण मित्र राजू सावळे व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाडुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, बलभीम भोसले, मिलिंद संधान, पोपट भोसले, अविनाश भोसले, विजयसिंह भोसले, पत्रकार रमेश मोरे, संगिता पाचंगे, महादेव मसाळ आदी उपस्थित होते.
कार्याची घेतली दखल
अण्णा जोगदंड अनधिकृत वृक्षतोडी विरोधात उच्च न्यायालयात लढा देत आहेत. तसेच पाणी बचतीवर पथनाट्याद्वारे जनजागृती मोहीम नदी स्वच्छता मोहिमेत सहभाग त्यांनी कारखान्यातील सांडपाणी व रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे कंपनीवर कार्यवाही करण्यास प्रशासनास भाग पाडले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन संजय मराठे यांनी केले तर. आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी मानले.