जळगाव। शहरातील अक्सा नगरातील मास विक्री करणार्यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांना सुरे व लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अतिक्रमण विभागाच्या महिला व पुरूष कर्मचार्यांना किरकोळ दुखापती झाली असून याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मनपातर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी देखील अक्सानगरातील मास विके्रेत्यांचे अतिक्रमण काढले होते. परंतू पुन्हा त्या भागाता दुकाना थाटून अतिक्रमण केल्याने शुक्रवारी पथक कारवाईसाठी गेले होते. त्यानंतर ही घटना घडली.
महापालिकेकडून शहरातील हॉकर्सचे अतिक्रमण काढताना तसेच आलेल्या तक्रारीवर कारवाई करताना कर्मचार्यांवर पथकातील कर्मचार्यांवर होणारे हल्ले थांबण्यास काही नाव घेत नाही. मनपा प्रशासनास प्राप्त तक्रारीवरून मेहरुण परिसरातील अक्सानगर मधे रस्त्यावर मास विक्री करणार्यांवर अतिक्रमण पथकाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी दुपारी बारा वाजता गेले. यावेळी शेख मुक्तार शेख गफ्फुर यांचे मास विक्रीचा हातगाडी रस्त्यावर असल्याचे अढळून आले. पथकातील कर्मचार्यांनी दुकान रस्त्यावर न लावण्यास सांगिल्यावरून शेख मुक्तार शेख गफ्फुर यांच्यासह तीन ते चार जणांनी अतिक्रमण पथकातील कर्मचार्यांशी वाद घातला. पथकातील कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यात आला. यावेळी महिला कर्मचारी रेहान बी शेख या महिला कर्मचार्यास मारहाण होत असतांना इतर कर्मचारी मधे पडले असता त्यांना चापटा बुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मास विक्रेत्यांनी बाजूला एका खोलीत ठेवलेले मास कापण्याचे सुरे आणून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पथकावर दगड फेक करण्यात आली. दगडफेकीच्या घटनेत पथकातील कर्मचारी सलमान भिस्ती हाताला विट लागल्याने जखम झाली. पथकामध्ये साजीदअली आबीद अली, अरुण मोरे, अर्जुन सोनवणे, हिरालाल बाविस्कर, अखिल बागवान आदींचा समावेश होता.
अन् कर्मचार्यांनी पोलिस ठाणे गाठले
दगडफेकीत नंतर अतिक्रमणच्या पथकातील कर्मचार्यांनी जीव मुठीत घेवून घटनास्थळावरून पळ काढून थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. जो पर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल जो पर्यंत होत नाही तो पर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नसल्याचा भूमीका कर्मचार्यांनी घेतली होती.
अक्सानगरात दगडफेकीने पळापळ
अतिक्रमण कर्मचारी व मास विक्रत्यांमध्ये झालेल्या वाद, मारहाण सुरू असतांना अचानक अतिक्रमण कर्मचार्यांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी अक्सानगर मध्ये एकच धावपळ उडाली. कर्मचार्यांनी जीव मुठीत धरून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे अक्सानगरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. मारहाण झाल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले.
जप्त केलेले वजन काटे चोरी
अतिक्रमण निर्मुलन पथकाने अक्सानगर येथे येण्यापूर्वी भाजी बाजारात केलेल्या कारवाईत तीन ते चार वजन काटे जप्त करून अतिक्रमण विभागाची ट्रॅक्टरमध्ये ठेवले होते. परंतू अक्सानगरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत टॅक्टरच्या ट्रॉलीतून हे वजन काटे चोरून नेल्याचा आरोप कर्मचार्यांकडून करण्यात आला. तर या घटनेदरम्यानच परिसरातील काहींनी जप्तवजन काटे चोरून नेल्याचे कर्मचार्याचं म्हणणे होते.
दुसर्यांदा झाली कारवाई
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच दुकानांवर दाखल तक्रारींवरून मनपाच्या कर्मचार्यांनी कारवाई करून दुकाानांचे अतिक्रमीत ओटे तोडले होते़ मात्र त्यानंतर देखिल मास विक्रेत्यांनी आपले दुकान सुरूच ठेवले होते़. यानंतर अतिक्रमणाची करवाई करण्यासाठी गेलेल्या प्रभाग क्रमांक 3 च्या प्रभाग अधिकारी व कर्मचार्यांना अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून दुकानदारांतून दमदाटी करण्यात आली तसेच धक्काबुकीही केली.
नगरसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई
मेहरुण परिसरातील नगरसेविका सुभद्रा नाईक, नगरसेवक इक्बाल पिरजादे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसापूर्वी अनधिकृत मास विक्री करणार्यांवर अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करून ओटे तोडण्याची कारवाई नगरसेवकांच्या उपस्थित केली होती. आजच्या कारवाईवेळी नगरसेवक उपस्थित नव्हते. मागे झालेल्या कारवाईचा रागातून आज पथकातील कर्मचार्यांवर हल्ला करण्यात आला अशी माहिती अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी दिली.