अतिक्रमण काढण्यासाठी तरुणाने रॉकेल ओतले : पोलिसांच्या तत्परतेने टळनी हानी

Attempt to set a young man on fire to remove encroachment: incident in Jalgaon जळगाव : कजगावातील बस स्थानकाच्या अवतीभोवती असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भूषण नामदेव पाटील (कजगाव) या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्याला वाचवले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एसटी महामंडळाचे अधिकारी दिलीप बंजारा यांनी त्या तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याची समजूत काढली.

तक्रार अर्जाला अधिकार्‍यांची टोपली
कजगावातील ग्रामपंचायतीच्या जागेत बस थांबा असून त्याच्या अवती भोवती अतिक्रमण झाल्यानंतर ते हटवण्याची मागणी भूषण पाटील याने गटविकास अधिकार्‍यांकडे केली मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर तरुणाने 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परीषदेकडे अर्ज केला. त्यावर कारवाई न झाल्याने 4 जुलै रोजी त्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही हे अतिक्रमण कायम राहिल्याने त्याने शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनानंतर आता कारवाईकडे लक्ष
हे अतिक्रमण काढण्यासाठी जागेची मोजणी करणे आवश्यक ठरणार असून त्यासाठीचा अर्ज भूमिअभिलेख विभागाला करण्यात आला आहे. त्यात नियमानुसार मोजणी केली जाणार आहे.