शिरपूर । शहरातील आदर्शन नगर भागात अतिक्रमण पीडितांच्या घरांवर शनिवारी बुलडोझर चालून गेले. दरम्यान 4 दिवसापासून आपल्या घरांना वाचवण्यासाठी शिरपूर नगरपालिकेसमोर बिर्हाड आंदोलन करणारे पीडित आज रविवारी देखील पालिकेसमोर आपला संसार उघड्यावर ठेवून आंदोलन करीत आहे. सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील यांच्यासह अतिक्रमण पीडितांनी पालिकेसमोरच स्वयंपाक करून सहभोजन केले.