अतिक्रमण वाचवण्यासाठी पालिकेनेच घातला घाट

0

वरणगाव। बर्‍याच दिवसाच्या प्रतिक्षेत असणार्‍या प्रतिभागनगर मधील नाल्यावरील पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली आहे . मात्र सदर बांधकाम हे नगरसेवक डॉक्टरांच्या दवाखाण्या समोर असुन त्यांचे अस्तित्वात असलेले अतिक्रमण वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होतांना दिसुन येत आहे.

दलित वस्तीमधील महिला शौचालयाला बाधा
वरणगाव येथील प्रतिभा नगरला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले असुन या बांधकामाशेजारी नगरसेवक डॉक्टरने नैसर्गिक व सांडपाणी प्रवाह असलेल्या नाल्यात आरसीसी सिमेंटचे कॉलम उभारुन भव्य असे अतिक्रमण केलेले दिसुन येत आहे. यामुळे कित्येक वर्षापासुन येणारे पाणी साचुन आहे. तरी पालिकेने कमकुवत झालेला खाजगी पुल तोडून पालिकेनेच सदर पुलाच्या बांधकामास सुरवात केली आहे. मात्र पुलाचे बांधकाम होत असतांना या परिसराचा व नाल्याच्या प्रवाहाचा विचार करणे अपेक्षीत होते.सदरील नगरसेवक डॉक्टरचे अतिक्रमण वाचवण्याकरीता पालिका व प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. सद्यस्थितीत होवु घातलेले बांधकाम लक्षात घेता नाल्यातील अतिक्रमीत सिमेंटचे क्रॉकेटी कॉलम वाचवुन शेजारीच पुलाचे बांधकाम वाकवुन करण्यात येत असुन नगरसेवक डॉक्टरांचे अतिक्रमण वाचवण्याचा घाट घातला आहे. यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पुलाला लागून पुढे असलेल्या दलित वस्तीमधील महिला शौचालयाला बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबधीत अधिकार्‍यांनी सर्वस्वी विचाऱ करुन कोणत्याही लोक प्रातिनिधीला पाठीशी न घालता नागरीकाच्या सुविधेच्या दुष्टीकोनातुन बांधकाम करावी अशी नागरीकांची अपेक्षा आहे.