अतिवृष्टीमुळे मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

0

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीसारखी परिस्थिती असल्याने जनजीवन विष्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील शाळा, महाविद्यालय, सकाळच्या सत्रात असणाऱ्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि मुंबई महानगर पालिकेला आवश्यक उपाययोजनेसाठी सूचना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढील दोन दिवस आणखी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.